Chinchwad : थेरगाव स्ट्राँग रूम परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान होणार ( Chinchwad)  आहे. प्रत्येक विधानसभा निहाय स्ट्रॉंग रूम बनवण्यात आल्या आहेत. चिंचवड विधानसभेसाठी पिंपरी चिंचवड मनपा कामगार भवन, थेरगाव येथे स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे. येथून मतपेट्यांचे वाटप आणि मतदान झाल्यानंतर संकलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिले आहेत. हा बदल रविवारी पहाटे पाच ते सोमवारी मतपेट्या जमा होईपर्यंत असेल.

 

स्ट्रॉंग रूम येथून मतपेट्या मतदान केंद्रांवर नेण्यासाठी आणि मतदान केंद्रांवरून परत आणण्यासाठी 138 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने खबरदारी घेतली आहे.

 

तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटा मार्गे जातील.

Pune Mumbai Express Way Accident : पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा अपघात; तिघांचा मृत्यू, आठ जण जखमी

 

थेरगाव पोलीस चौकी येथून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने थेरगाव पोलीस चौकी येथून उजवीकडे वळून पाण्याची टाकी मार्गे जातील.

 

माध्यमीक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस बंदी. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने माध्यमीक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून उजवीकडे वळून ग प्रभागच्या ( Chinchwad)  रोडने जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.