Pune Mumbai Express Way Accident : पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा अपघात; तिघांचा मृत्यू, आठ जण जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात खोपोली जवळ ( Pune Mumbai Express Way Accident ) शुक्रवारी (दि. 10) पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, बोरघाटात खोपोली जवळ पुणे मुंबई लेनवर भरधाव जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली. तिन्ही वाहने वेगात होती. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाल्याने द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

AkshayTritiya : अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांची ओळख अद्याप पटलेली ( Pune Mumbai Express Way Accident ) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.