Express Way Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एक जण जागीच ठार

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ एका टेम्पोचा ( Express Way Accident ) भीषण अपघात झाला. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो कंटेनरवर आदळला. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 7) सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला.

विनोद यादव (रा. वापी, गुजरात) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

MPSC : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद यादव हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने टेम्पो (जीजे 15/एक्सएक्स 9283) घेऊन जात होता. खोपोली जवळ नवीन बोगद्यामध्ये (किमी 39.200) आल्यानंतर यादव याचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो समोर जाणाऱ्या कंटेनर (एमएच 46/बीएम 1169) ला धडकला. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केबिनमध्ये दबल्याने चालक विनोद यादव याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, रुग्णवाहिका, मृत्युंजय देवदूत टीमने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ मुंबई लेनवर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत ( Express Way Accident ) केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.