Bhosari : गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  गांजा विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर लांडगेनगर येथे करण्यात(Bhosari) आली.

 

पोलीस अंमलदार प्रभाकर खाडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी मधील लांडगेनगर येथे एक महिला गांजा विक्रीसाठी आली असल्याची माहिती भोसरी येथे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 78 हजार 100 रुपयांचा एक किलो 572 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तिने हा गांजा दुसऱ्या महिलेकडून आणला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे महिलेला गांजा देणाऱ्या महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत(Bhosari) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.