Bhosari : गुंतवणुकीतून 20 पटीने नफा देण्याच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूक केल्यास 20 पटीने नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून 27 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक (Bhosari) केली. ही घटना 26 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडली.

विवेक भीमराव पाटील (वय 43, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपाली शर्मा, जय सहानी, आर्या शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून गोल्डमन सच या कंपनीत गुंतवणूक केल्यास एका महिन्यात 20 पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून पाटील यांनी आरोपींना 27 लाख 45 हजार रुपये पाठवले. पैसे घेऊन नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता पाटील यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.