Pune : निम्म्या पुण्याचा पारा चाळीशी पार, जिल्ह्यात वडगाव शेरी येथे झाली सर्वात जास्त 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर हैराण, शिवाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 41.8 अंश तापमानाची नोंद

एमपीसी न्यूज –  राज्यावरील अवकाळीचे ढग विरून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचे कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. उन्हाचा कडाका संपूर्ण जिल्ह्यात(Pune) वाढला असून जिल्हयातील नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

 

पुणे जिल्ह्यात वडगाव शेरी येथे सर्वात जास्त 43.4 अंश तापमानाची नोंद झाली असून लावासा येथे सर्वात कमी 38.० अंश सेल्सिअसची नोंद झाल्याचे कळून येते. शिवाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची(Pune) नोंद झाली असून चिंचवडमध्ये 42.7 अंशाची नोंद झाली आहे.

 

पुढील तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहण्याचा आणि तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

पुणे जिल्हयातील महत्त्वाच्या भागांत आज नोंद झालेले तापमान पुढीलप्रमाणे :-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.