Heat Wave Advisory : अति उष्णतेच्या लाटेत अशी घ्या काळजी

एमपीसी न्यूज – देशातील अनेक भागांत अति उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कडक उन्हाळा सुरु असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यासाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) यांनी आरोग्याबाबत काळजी घेण्याचा(Heat Wave Advisory) सल्ला दिला आहे.

हे करा –

जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही. तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही.
प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक/लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावे.
टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्या.
पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
तुमचे डोके झाकून ठेवाः थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापरावे.
उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
रेडिओ, टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वेबसाइट https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घेत रहावे.
हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा.
जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी.
दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.

संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी

जरी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
समाविष्ट घटक – लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असेलेल व्यक्ती
शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब
थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या(Heat Wave Advisory) प्रवाश्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.

इतर खबरदारी

एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे.
तुमचे घर थंड ठेवा; पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा.
दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.
शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.
पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.

‘हे’ करू नका

उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषतः दुपारी 12 ते 03 च्या दरम्यान बाहेर जाणे टाळावे.
दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.
अनवाणी बाहेर जाऊ नका.
अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा – कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात.
उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.