Pune : मनी लॉन्ड्रींगची केस असल्याचे सांगत तरुणाची नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रींगची केस असल्याचे सांगत तरुणाकडून 9 लाख 16 हजार 256 रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाईन माध्यमातून मगरपट्टा सिटी येथे घडली.

याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाने हडपसर(Pune) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : व्हिडीओ लाईक, शेअर केल्यास पैसे मिळतील असे सांगत तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी तरुणाला संपर्क केला. तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रींगची केस आहे, असे सांगून त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर चौकशीच्या बहाण्याने तरुणाकडून 9 लाख 16 हजार 256 रुपये घेत आर्थिक फसवणूक केली. हडपसर(Pune) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.