Chikhali : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 9 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 ऑक्टोबर 2023 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडली. 

 

याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा(Chikhali) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने एका एजंटच्या इंस्टाग्रामची माहिती दिली. नेटवरील मर्चंटचे प्रोडक्ट अपलोड करून रेटिंग दिल्यास एका रेटिंगला 0.47 डॉलर मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला काही रक्कम फिर्यादीच्या खात्यावर पाठवली. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादित करून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 9 लाख 56 हजार 868 रुपये(Chikhali) घेत त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.