Chikhali : गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर(Chikhali) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1 मे) रोजी  दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पाटीलनगर, चिखली येथे करण्यात आली. 

 

आदित्य कालिदास थोरात (वय 22, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आणि त्याच्या साथीदाराने बेकायदेशीरपणे स्वतःकडे गावठी कट्टा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी आदित्य थोरात याला ताब्यात(Chikhali) घेतले. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.