Chikhali :बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

61 हजारांची देशी आणि विदेशी दारू जप्त

एमपीसी न्यूज -बेकायदेशीरपणे दारू विक्रीसाठी देशी, विदेशी दारूचा साठा कारमधून नेत असताना एकावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी 61 हजारांचा दारूसाठा आणि एक कार(Chikhali) जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 30) सायंकाळी आळंदी-देहू रोडवर चिखली येथे करण्यात आली.

 

 

पोलीस अंमलदार अजित रूपनवर यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास मुरलीधर कबाडे (वय 34, रा. देहूगाव, पुणे. मूळ रा. बुलढाणा) याच्या विरोधात गुन्हा(Chikhali) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 48/एफ 1810) मधून बेकायदेशीरपणे देशी, विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा विक्रीसाठी जवळ बाळगला. याबाबत गुन्हे शाखेला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत 61 हजार 280 रुपयांचा देशी, विदेशी मद्यसाठा आणि दोन लाख रुपये किमतीची कार जप्त केली(Chikhali) आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.