Khed : भीमा नदीकाठावरील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

पोलिसांना पाच हजार लिटर कच्चे रसायन आणि 315 लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात यश

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी पाच हजार लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि 315 लिटर तयार दारू नष्ट केली. ही कारवाई बुधवारी (दि. 1) दुपारी दोन वाजता करण्यात(Khed) आली. 

 

राहुल राजपूत, प्रदुम्न राठोड (दोघे रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Nigdi : निगडी येथे 29 लाखांची रोकड जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे भीमा नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे(Khed) पाच हजार लिटर कच्चे रसायन आणि 15 हजार 750 रुपये किमतीची 315 लिटर तयार दारू नष्ट केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.