PCMC: बजाज कंपनीतर्फे युवक-युवतींसाठी व्यावसायिक कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण

एमपीसी न्यूज: बजाज कंपनीच्या सी.एस.आर.उपक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड भागातील अठरा ते तीस वयोगटातील गरीब व गरजू युवक-युवतींसाठी विविध व्यवसायाभिमुख कोर्सेसचे प्रशिक्षण युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर (USDC) मार्फत देण्यात येत आहे.

 

यामध्ये मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, एसी व रेफ्रीजरेटर मेकॅनिक, पीसीबी असेम्ब्ली ऑपरेटर, फायनान्शियल अकौंटिंग, ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा विविध कोर्सेस उपलब्ध(PCMC) आहेत.

येत्या 15 मे पासून जानकीदेवी बजाज समाज सेवा केंद्र, आकुर्डी या ठिकाणी कोर्सेसना सुरुवात होणार आहे. तसेच काही कोर्सेस युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या चिंचवड शाखेत होणार आहेत. सर्व समाज घटकातील कोणीही या कोर्समध्ये भाग घेऊ शकतो. यामध्ये कोर्स पूर्ण केल्यानंतर सहज आणि त्वरीत नोकरी उपलब्ध होऊ शकेल आणि व्यवसाय देखील सुरू करता येईल अशा कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर मार्फत पुणे, चिंचवड, शिरूर, नाशिक मध्ये अशा प्रकारचे(PCMC) उपक्रम राबवून हजारो युवकांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देवून सक्षम केले आहे तरी पिंपरी-चिंचवड शहरातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जानकीदेवी बजाज समाज सेवा केंद्र, आकुर्डी किंवा युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर, चिंचवड या केंद्रावर भेट द्यावी किंवा 9822085258 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Maval LokSabha Election : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी – चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.