Pimpri : पिंपरीगावात महायुतीच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरीगावातील निवडणूक कचेरीचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल (1 मे) रोजी(Pimpri) रात्री करण्यात आले.

पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकात जाहीर प्रचारसभा संपल्यानंतर आठवले यांनी पिंपरीगावात जाऊन निवडणूक कचेरीचे फीत कापून औपचारिक उद्घाटन केले. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आचारसंहितेमुळे कोणाचीही भाषणे होऊ शकली नाहीत. निवडणूक कचेरीच्या बाहेर पिंपरी गावातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती.

Pimpri : सर्वसामान्यांना सामाजिक न्यायांबरोबरच आर्थिक न्याय देण्यासाठी मोदी प्रयत्नशील – रामदास आठवले

निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे नेते बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, कुणाल वाव्हळकर, भाजपचे नेते सदाशिव खाडे, अमित गोरखे तसेच माजी नगरसेवक संदीप वाघेरे, नारायण बहिरवाडे, ज्योतिका मलकानी तसेच चंद्रशेखर अहिरराव व महायुतीचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने(Pimpri) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.