Pimpri : सर्वसामान्यांना सामाजिक न्यायांबरोबरच आर्थिक न्याय देण्यासाठी मोदी प्रयत्नशील – रामदास आठवले

एमपीसी न्यूज –  डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांकडून (Pimpri )गचाळ व विषारी प्रचार करण्यात येत आहे. संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, असा विषारी अपप्रचार ते करीत आहेत. हिटलरशाही असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागायला आले असते का, असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे (Pimpri )उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर होते. आपल्या खास शैलीत काव्यरचना सादर करीत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, अजीज शेख, सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, युवा सेनेचे नेते विश्वजीत बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सुजाता पालांडे, आरपीआयच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कमल कांबळे तसेच सुनील कांबळे, राजेंद्र कांबळे, सम्राट जकाते, सुजित कांबळे, दयानंद वाघमारे, मदन नाईक, अनुराग भागवत, मोहन म्हस्के, अनिल सरवदे, ख्वाजाभाई शेख, शादाब पठाण, सिकंदर सूर्यवंशी, विनोद चांदमारे, अनुराधा गोरखे, राजेश पिल्ले, सुरेश निकाळजे, राजेंद्र तरस, अण्णा वायदंडे, शीतल शिंदे फजल शेख, नारायण बहिरवाडे, संदीप वाघेरे, बाळासाहेब ओव्हाळ, स्वप्नील कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.

*विरोधकांवर हल्लाबोल*

रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान व डॉ. आंबेडकर यांचा नीतांत आदर करतात. त्यामुळे राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसा प्रयत्न कोणी केला तर आम्ही तो हाणून पाडू. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे हजारो तरुण बलिदानासाठी तयार आहेत. समाजात गैरसमज पसरवण्या व्यतिरिक्त विरोधकांकडे काहीही नाही. नरेंद्र मोदी हे खमके नेते आहेत आणि त्यांच्याबरोबर माझ्यासारखा पठ्ठ्या आहे. त्यामुळे विरोधकांचे बारा वाजणार आहेत. महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देखील दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मोदींना हटवणे सोपे नाही.

*सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्यायही*

सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीचा विचार करून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. मोदी हे गरीब ओबीसी कुटुंबातील आहेत. मोदी हे हिंदू असले तरी सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत, असे आठवले यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या विविध योजना पण लोकहिताच्या निर्णयांची यावेळी त्यांनी माहिती दिली.

*आठवले यांची काव्यमैफल*

आपल्या भाषणात यमक जुळवून कविता सादर करण्याच्या खास शैलीसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. या सभेतही त्यांनी अशाच शिघ्र कविता सादर करीत टाळ्या मिळवल्या. ‘ज्याच्या नशिबात नाही हारणे, त्याचं नाव आहे श्रीरंग बारणे’, ‘नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी आहेत अनेक कारणे, मग का निवडून येणार नाहीत बारणे?’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत चमकणारा तारा, काँग्रेस आणि इंडी आघाडीचे वाजणार बारा’, ‘श्रीरंग आप्पा माणूस आहे साधा भोळा, म्हणून विरोधकांच्या पोटात उठतोय गोळा’, ‘घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे आण, निवडून द्या श्रीरंग आप्पांचे धनुष्यबाण’ अशा रचना सादर करीत आठवले यांनी टाळ्या मिळवल्या.

 

 

Alandi: माऊलींच्या पालखी सोहळ्यात कुऱ्हाडे कुटुंबीयांना बैलजोडीचा मान

खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांच्या आढावा सादर केला. मेट्रो, अमृत भारत रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, अटल सेतू, मिसिंग लिंक, जेएनपीटीसाठी आठ पदरी रस्ता अशा विविध विकास प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली.

आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे तसेच शंकर जगताप, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, संदीप वाघेरे, अजित शेख, सदाशिव खाडे, अमित गोरखे, कमल कांबळे, प्रदीपकुमार बेंद्रे आदींची यावेळी भाषणे झाली. विनोद चांदमारे यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.