Alandi: माऊलींच्या पालखी सोहळ्यात कुऱ्हाडे कुटुंबीयांना बैलजोडीचा मान

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला(Alandi) जुंपण्यात येणाऱ्‍या मानाच्या बैलजोडीचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील कुऱ्हाडे घराण्याला मिळाला आहे.

 

या संदर्भातील बैठक आज दि.2 मे रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कार्यालय आळंदी येथे पार पडली.

 

बैलजोडी समितीच्या बैठकीला  बैलजोडी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष बबनराव कुऱ्‍हाडे, नंदकुमार कुऱ्‍हाडे,शिवाजी रानवडे,विलास घुंडरे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर वहिले आदी सदस्य उपस्थित होते. पालखी सोहळा रथ बैलजोडीचा मान मिळावा याकरिता आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबीयांकडून पाच अर्ज समितीकडे आले होते.

 

 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैलजोडी समिती(Alandi) सदस्यांच्या झालेल्या आज च्या या बैठकीत  आळंदीतील  सहादू बाबुराव कुऱ्हाडे(वस्ताद)यांच्या कुटुंबाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बैलजोडीचा मान‌ देण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला.

 

Maval LokSabha Elections 2024 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी वाघेरे यांच्या प्रचारात सक्रिय

 

 यावेळी देवस्थान तर्फे शाल श्रीफळ देऊन मानकरी सहादू बाबुराव कुऱ्हाडे (वस्ताद) यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामस्थांनी या निवडी बद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,पांडुरंग वरखडे , सागर भोसले,आळंदीकर ग्रामस्थ व देवस्थान कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

 

माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुऱ्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहीले, रानवडे कुटुंबालाच मिळतो, आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे.असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.