Wakad : सराईत गुन्‍हेगाराचा खून करणाऱ्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून सराईत गुन्‍हेगाराचा खून करण्‍यात आला. ही घटना बुधवारी (दि. 1 मे) रोजी सायंकाळी काळेवाडी फाटा येथे घडली. यातील तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

ऋतिक दिलीप चव्हाण (वय 21, रा. महादेव आळी, जुनी सांगवी), प्रेम्या उर्फ प्रेम प्रकाश मोरे (वय 18, रा. शितळानगर, जुनी सांगवी) आणि दीपक कोकाटे अशी अटक केलेल्या आरोपींची(Wakad) नावे आहेत. रिहान शेख (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्‍या सराईत गुन्‍हेगाराचे नाव आहे.

गुन्‍हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त संदिप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मयत रिहान याने काही दिवसांपूर्वी आरोपी प्रेम मोरे याच्‍या घरी जाऊन त्‍याला मारहाण केली होती. याचा राग आरोपींच्‍या मनात होता. 1 मे रोजी सायंकाळी रिहान हा सांगवीतून जाताना आरोपींना दिसला. आरोपी ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, त्‍याचा मित्र दिपक कोकाटे आणि दिपकचा मित्र कार्तिक यांनी त्‍याचा पाठलाग केला. काळेवाडी फाट्याजवळ असलेल्या पुलावर त्‍याला अडवून आरोपी ऋतिक चव्हाण याने चाकूने व इतर आरोपींनी लाथा बुक्‍क्‍यांनी आणि दगडाने मारहाण करून रिहान(Wakad) याचा खून केला.

 

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे व विजय दौंडकर यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्‍यानुसार निगडी जकात नाक्‍याजवळून आरोपी ऋतिक चव्हाण, प्रेम प्रकाश मोरे यांना अटक केली. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीवरून तिसरा आरोपी दीपक कोकाटे यालाही अटक केली. तर चौथ्‍या आरोपीचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.