Wakad: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला प्राण गमवावा लागला

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात बुधवारी (दि.8) रोजी वाकड येथे झाला आहे.याप्रकरणी वाकड पोलिसांनी खुर्शीद ऐताल शेख (वय 26 रा.हिंजवडी) याला अटक केली आहे. अजिंक्य विजयकुमार खोत (वय 43) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात मयत खोत यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अजिंक्य हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील सिमेंटचा ट्रक निष्काळजीपणाने चालवत  अजिंक्य खोत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अजिंक्य हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. यावरून पोलिसांनी ट्रक चालक खुर्शीद शेख याला अटक(Wakad) केली आहे. वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Pimpri: व्यावसायिकाला रस्त्यात अडवून चौघांकडून मारहाण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.