Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; 29 जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान

श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व्यवस्थापक  ज्ञानेश्वर वीर यांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2024 चा दिनक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्याकडून जाहीर झाला असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान 29 जून रोजी होणार आहे. याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक  ज्ञानेश्वर वीर(Alandi)  यांनी  दिली.

 

29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्रींच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान होऊन रात्रीचा मुक्काम (गांधी वाडा) दर्शन मंडप इमारत आळंदी देवस्थान येथे होणार आहे. 30 जून रोजी आळंदीहुन पालखी पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. 30 जून रात्री व 1 जुलैच्या रात्री पुणे येथे पालखी मुक्कामी असणार आहे.
पुढीलप्रमाणे पालखी मुक्काम –

2 जुलै रोजी पुण्याहून सासवडकडे प्रस्थान, 2 जुलै रात्री व 3 जुलै रोजी सासवड मुक्कामी,  4 जुलै जेजुरी,  5 जुलै वाल्हे,  6 जुलै श्रींचे नीरा स्नान, लोणंद व  (6 जुलै व 7 जुलै ) लोणंद मुक्कामी,  8 जुलै (चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले) तरडगाव, 9 जुलै  फलटण,  10 जुलै बरड,  11 जुलै नातेपुते, 12 जुलै (पुरंदवडे गोल रिंगण पहिले ) माळशिरस, 13जुलै (खुडूस फाटा गोल रिंगण दुसरे) रात्री वेळापूर मुक्कामी,  14 जुलै (ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण तिसरे), (पहिला टप्पा संत सोपानदेव भेट) रात्री भंडीशेगाव मुक्कामी, 15 जुलै (बाजीरावची विहीर उभे रिंगण दुसरे, गोल रिंगण  चौथे) रात्री वाखरी मुक्कामी, 16 जुलै (पादुका जवळ आरती व उभे रिंगण तिसरे) पंढरपूर, 17 जुलै पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.
पुढील प्रमाणे परतीचा प्रवास
20 जुलैपर्यंत सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. 21  जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट , पादुकां जवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे. परतीचा प्रवास 21 जुलै वाखरी, 22 जुलै वेळापूर, 23 जुलै नातेपुते, 24 जुलै फलटण, 25 जुलै पाडेगाव, 26 जुलै (श्रींचे नीरा स्नान)वाल्हे, 27 जुलै सासवड, 28 जुलै हडपसर,  29 जुलै (भवानी पेठ)पुणे, 30 जुलै आळंदी, 31 जुलै आळंदी नगरप्रदक्षिणा, हजेरी मारुती मंदिर नारळ प्रसाद, श्री माऊलीं मंदिर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.