Alandi :अक्षय्य तृतीयानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटी द्वारे साकारण्यात आला प्रभू श्री रामाचा अवतार

आळंदी:- आज शुक्रवार  (दि. 10) अक्षय्य तृतीयानिमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर प्रभू श्री राम  अवतार ही आकर्षक चंदन उटी साकारण्यात आली.

 

आजची चंदन उटी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच स्वकाम सेवा मंडळ (कलाकार अभिजीत धोंडफळे व सहकारी)यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आली.मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक अशी मोगऱ्यांच्या फुलाची सजावट करण्यात आली होती. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर साकारण्यात आलेले प्रभू श्री रामाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Pune :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे अक्षय्यतृतीयेनिमित्त आयोजन ; गणरायाला तब्बल 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.