Maval Loksabha : देशाच्या हितासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिला श्रीरंग बारणे यांना बिनशर्त पाठिंबा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत दिले पाठिंब्याचे पत्र

एमपीसी न्यूज: मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि.(10 मे) रोजी पिंपरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाहीर सभेमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने मावळ लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना ब्राह्मण महासंघाच्या वतीने बिनशर्त जाहीर पाठिंब्याचे(Maval Loksabha) पत्र दिले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटले आहे की,देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, हितासाठी आणि सनातन हिंदू धर्म जपण्यासाठी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना समस्त ब्राह्मण समाजाने पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारणी बैठकीमध्ये  घेण्यात आला.या निर्णयाचे संपूर्ण ब्राह्मण समाजाने स्वागत केले असून पुढील वाटचालीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे(Maval Loksabha) यांना  हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

             

पाठिंब्याचे पत्र देताना दिलीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे, सुषमा वैद्य, आनंद देशमुख, राहुल कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, अतुल इनामदार, संध्याताई कुलकर्णी, प्रवीण कुरबेट, पंकज कुलकर्णी, अभय कुलकर्णी, खरे राजन बुडूख, मकरंद कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी व इतर कार्यकारणी मंडळ यावेळी उपस्थित होते.

Loksabha Election : निवडणुकीत ‘गडबड’ करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कामच करून टाकीन – अजित पवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.