Alandi : कचरा रस्त्यावर आल्याने वाहनांच्या रहदारीस अडथळा

एमपीसी न्यूज :- आळंदी ग्रामीण,चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साठल्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांस तेथून ये-जा करण्यास अडसर निर्माण होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कचऱ्याचे निराकरण केले जावे असे स्थानिक नागरिकांचे(Alandi) म्हणणे आहे.

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, आळंदी ग्रामीण,चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव रस्त्यावरच कचऱ्याचा काही भाग आलेला आहे.तसेच त्या रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठला आहे.त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांस तेथून ये-जा करण्यास अडसर निर्माण होत आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे.

तसेच,रस्त्यावर कचरा आल्याने तेथील रस्ता अरुंद होऊन वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.ग्रामपंचायतीमार्फत तेथील कचरा उचलला जातो परंतु बहुतेक वेळेस त्या कचऱ्यास समाजकंटकाकडून आग लावली जाते.व त्याचा मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो.त्यामुळे वायुप्रदषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. यामुळे तेथील भागात कचरा होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना व्हावी,असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

 

चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीत मरकळ रस्ता ,धानोरे रस्ता ते चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गावरील पुलाजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येत असल्याचे समजते.दुर्दैवाने त्या कचऱ्यास सुद्धा बहुतेक वेळा समाजकंटकाकडून आग लावली जाते.आळंदी पालिका हद्दीत चाकण रस्ता येथून असणाऱ्या बाह्यवळण मार्गावर आळंदी केळगाव रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा असतो त्या कचऱ्यास सुद्धा समाजकंटकाकडून मोठ्या प्रमाणात आग लावली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.