Pimpri: गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Pimpri)एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 731 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) मध्यरात्री भाटनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

सोन्या उर्फ देवदास महेश मलकेकर (वय 23, रा. लिंक रोड, पिंपरी)(Pimpri) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : लखनऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भिंतीपलिकडचे जग’ माहितीपटाला उत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटनगर पिंपरी येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सोन्या मलकेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो 731 ग्रॅम गांजा, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण एक लाख 47 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.