Kolhapur Loksabha Election : मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज दि.(7 मे) रोजी मतदान सुरु असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “कोल्हापूर शहरातील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या 69 वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्या वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ(Kolhapur Loksabha Election) उडाली आहे”.

महादेव श्रीपती सुतार (वय 69, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या वृद्ध मतदाराचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, “देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (दि. 7) सुरु आहे. कोल्हापूर मतदारसंघाचा देखील तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. कोल्हापूर शहरात उत्तरेश्वर पेठेत राहणारे महादेव सुतार यांचे मतदान उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत आहे. ते मंगळवारी सकाळी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले”.

हा प्रकार निदर्शनास येताच मतदान केंद्रातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच(Kolhapur Loksabha Election) खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.