Beed Loksabha Election : इंडी आघाडीतील नेते दलित,आदिवासी आणि मागासवर्गीय वर्गाचे आरक्षण रद्द करण्याचे प्रयोजन करत आहे – पंतप्रधान मोदी

महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची बीड येथे सभा

एमपीसी न्यूज : “इंडी आघाडी सत्तेत आल्यानंतर राम मंदिर,कलम 370 रद्द करण्याच्या योजना करत असून कॉंग्रेसचे राजकुमार दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय वर्गाचे आरक्षण काढून मुसलमानांना देण्याचे प्रयोजन करत आहे” अशी जहरी टीका पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर  केली आहे.

पंतप्रधान मोदी यांची बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज दि.(7 मे) रोजी बीड येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड लोकसभा मतदारसंघातील  महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंकी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे,आमदार सुरेश धस, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, बीड जिल्हयातील महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने(Beed Loksabha Election) उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “इंडी आघाडीतील चारा घोटाळ्यातील नेते लालूप्रसाद यादव यांनी आज नमूद केले आहे की दलित,आदिवासी आणि मागासवर्गीय वर्गाचे आरक्षण काढून मुसलमानांना देण्यात येईल.परंतु,जोपर्यंत नरेंद्र मोदी जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही दलित,आदिवासी आणि मागासवर्गीय जनतेचे आरक्षण रद्द करू शकत नाही”.

Loksabha Election: पिंपळे सौदागर येथेही होणार मेट्रोची सुविधा उपलब्ध – खासदार श्रीरंग बारणे

आज बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी भाजप पक्षाबरोबर आहे. कॉंग्रेस बरोबर नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम भाजप सरकारने चालू केले पण महाविकास आघाडीने बुलेट ट्रेनच्या कामात अनेक अडथळे आणले. मागील 60 वर्षांत कॉंग्रेस पक्षाने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविला नाही पण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न चालू(Beed Loksabha Election) केला आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. येत्या 13 तारखेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाडा विकसित करण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडे यांना अधिक मताधिक्याने निवडून देऊन संसदेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.