Shirur:अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची उद्या शिरूरमध्ये जाहीर सभा

एमपीसी न्यूज- महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभेचे (Shirur)उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी उद्या शरद पवार जाहीर सभा घेणार आहेत. बारामती मतदारसंघाची निवडणूक झाली असून शरद पवार शिरूर मतदार संघात सक्रिय होतआहेत. या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे.

उद्या शिरूर मधील पाच कंदील चौकात दुपारी एक वाजता(Shirur) शरद पवारांची जाहीर सभा होणारआहे.या सभेला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Solapur Loksabha Election : मराठा आरक्षणासाठी सांगोल्यात मतदाराने ईव्हीएम जाळले

ओतूरच्या सभेत डॉ. कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 15 वर्षाच्या खासदारकीच्या कामकाजाचा बुरखा फाडला. आढळराव पाटील हे स्वतःच्या कंपनीला फायदेशीर ठरतील अशा पद्धतीने संसदेत केवळ संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत असल्याचा आरोप डॉ.कोल्हे यांनी केला होता. डॉ. कोल्हे यांनी पुरावा देणारे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

आता उद्याच्या जाहीर सभेत डॉ. कोल्हे कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.