Solapur Loksabha Election : मराठा आरक्षणासाठी सांगोल्यात मतदाराने ईव्हीएम जाळले

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणासाठी सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने आज दि.(7 मे) रोजी पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळले. तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना ही घटना घडली. त्यामुळे सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर येथे फेरमतदान घेतले जात(Solapur Loksabha Election) आहे.

दादासाहेब तळेकर यांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बागलवाडी मध्ये सुमारे 1300 मतदान आहे. मंगळवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दादासाहेब हे मंगळवारी दुपारी मतदान करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी लहान बाटलीमध्ये पेट्रोल नेले होते. दादासाहेब यांनी ईव्हीएमवर पेट्रोल ओतले आणि पेटवून(Solapur Loksabha Election) दिले.

ईव्हीएम पेटल्याचे दिसताच मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. जळणाऱ्या ईव्हीएमवर पाणी मारून आग विझवण्यात आली. यामध्ये ईव्हीएम पूर्णपणे खबर झाले. प्रशासनाने नवीन ईव्हीएम मशीन आणून फेरमतदान सुरु केले आहे.

दादासाहेब तळेकर यांनी हे कृत्य का केले,असा प्रश्न सर्वांना पडला होता.  मराठा आरक्षणासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे चौकशीअंती समजले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.