Talegaon Dabhade:प्रा. प्रकाश जकातदार आणि नादमुद्रा  यांच्या ” सूर तेच छेडीता”मध्ये रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे येथील कलापिनी मध्ये 28 एप्रिल(Talegaon Dabhade) रोजी कलापिनी कलामंडळातर्फे कै. कमालिनी पुरुषोत्तम परांजपे स्मृतिपुष्प साजरे केले आणि त्या निमित्ताने प्रा. प्रकाश जकातदार आणि नादमुद्रा यांनी संयुक्तपणे ” सूर तेच छेडीता” ही केली. 50  ते 70 च्या दशकात झालेले सर्व गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका, त्याचबरोबर वाद्यवृंद याने रसिकांना कायमच  त्या संगीताची भूरळ घातली आहे.

कलापिनीच्या सर्व रसिकांना सूर तेच छेडिता हा कार्यक्रम त्या सुवर्ण युगात (Talegaon Dabhade)घेऊन गेला. प्रज्ञा देशपांडे, सावनी सावरकर, नील आणि अथर्व सुळे हे  नवीन पिढीतील गायक. पण जुन्या गण्यावराची त्यांची पकड आणि सफाई श्रोत्यांना खूप भावली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अनिल गोडे, महेंद्र कुमार, मकरंद देशपांडे हे वादक. त्यांची अकोर्डियन, साक्सोफोन आणि मेंडोलिन वरची सफाई वृद्धानाही ताल धरायला भाग पाडत होती.  स्वतः R D Barman आणि शंकर जयकिशन या दिग्गज संगीतकारांबरोबर या तिघांनी काम केले आहे. त्याच्या जोडीला की बोर्ड वर होते यश भंडारे आणि ताल वाद्यावर साथ दिली पद्माकर गुजर आणि विनोद सोनवणे यांनी. नादमुद्राच्या उदय नानिवडेकर यांनी मोट बांधली आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जकातदार काकांनी माऊथ ऑर्गन वर वाजवलेली गाणी… मेरा नाम चीं चीं चू, प्यार हुआ इकरार हुआ, मेरा जुता है जापानी अशी अनेक गाणी ऐकताना त्यांची passion आणि मेहेनत दोन्हींचा प्रत्यय आला. सोनाली श्रीखंडे यांनी ओघावत्या मधाळ भाषेत उत्कृष्ठ निवेदन केले.

Shirur:अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची उद्या शिरूरमध्ये जाहीर सभा

कलापिनीचे सभागृह खरोखर खचाखच भरले होते आणि तीन तास मंत्रमुग्ध होऊन या सूर आणि  तालाच्या दुनियेत हरवून गेले होते.

तसेच प्रा. जकातदारांचे एक स्नेही . राहुल लाड..जे  लंडन मध्ये स्थायिक झाले असून त्यांनी भारतीय संगीताचा वारसा जपण्याचे काम त्यांच्या “सजदा” या संस्थेतर्फे करत आहेत. ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. डिजिटल युगात वेगवेगळ्या वाद्यांचा विसर पडून चालणार नाही. मेंडोलिन, अकॉर्डियन ही वाद्ये वय झाले तरी रियाज चालू ठेवून अजूनही शिताफीने वाजवणाऱ्या वादक कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. कलापिनी ज्या प्रकारे एक सांस्कृतिक परंपरा जपत, ती एक चळवळ म्हणून राबवत आहे, त्याचे श्री. लाड यांनी कौतुक केले. प्रा. जकातदार यांनीही तळेगावात कार्यक्रम करण्याची संधी मिळाली म्हणून कलापिनीचे आभार मानले.  सर्व जाणकार, रसिक प्रेक्षकांनी ह्या सुरेल संगीतमय संध्येचा मनापासून आस्वाद घेतला.

मध्यंतरात कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे,डॉ. अश्विनी परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर,कार्याध्यक्ष अंजली  सहस्त्रबुध्दे, उपाध्यक्ष अशोक बकरे,  खजिनदार श्रोशैल गद्रे, अन्य सदस्य विनायक भालेराव, संजय मालकर, हेमंत झेंडे आणि कलामंडळ अध्यक्ष चेतन शहा  यांनी सर्व गायक आणि वादक कलाकारांचा सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी  रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे, अविनाश शिंदे व सहकारी आणि कलापिनी  महिला मंच यांचा सहभाग होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.