Nigdi : निगडी येथे 29 लाखांची रोकड जप्त

एमपीसी न्यूज – आचारसंहिता काळात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती-शक्ती चौकाजवळ(निगडी) येथे निवडणूक विभागाच्या पथकाने एका कारमधून 29 लाख 50 हजारांची रोख रक्कम(Nigdi) जप्त करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मावळ लोकसभा मतदारसंघात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी मधील भक्ती-शक्ती चौकाजवळ निवडणूक विभागाची चेकपोस्ट आहे. या ठिकाणी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (एसएसटी) संशयित वाहनांची तपासणी करते. या पथकाला तपासणीदरम्यान एका कारमध्ये 29 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम(Nigdi) मिळाली.

 

Loksabha Election 2024 : शनिवार वाड्यासमोर 3 लाख 80 हजारांची रोकड जप्त

 

त्यानुसार पथकाने संबंधित व्यक्तीकडे रकमेबाबत विचारपूस केली पण त्या व्यक्तीला योग्य कारण देता आले नाही. त्यामुळे पथकाने आयकर विभागाला याबाबत माहिती दिली. आयकर विभागाकडून या रकमेबाबत चौकशी केली जात आहे. या रकमेबाबत संबंधित व्यक्तीला तपशील देता आला नाही तर त्याबाबत कारवाई होणार आहे.

 

एक कोटी 20 लाखांची रोकड पकडली

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका कार मध्ये 26 मार्च रोजी 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या शेजारी एका आलिशान कारमध्ये 13 लाख 90 हजार रुपयांची रोकड मिळाली. 23 एप्रिल रोजी वाकड – हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम पकडली. निगडी येथील कारवाईनंतर आतापर्यंत विविध पथकांनी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एक कोटी 20 लाख 40 हजार रुपयांची रोकड पकडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.