Loksabha Election 2024 : मतदार यादीतील नाव शोधायचंय मग अधिकृत संकेतस्थळ किंवा सहाय्यता कक्षाची मदत घ्या

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच मतदार चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून  मतदारांनी ही माहिती मिळविण्यासाठी समाजमाध्यमातून फिरणाऱ्या चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले(Loksabha Election 2024) आहे.

 

मतदारांना भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येणारा 1950 क्रमांकावर मतदार क्रमांक पाठविल्यास 15 सेकंदात मतदार चिठ्ठी मिळेल असा संदेश पूर्णत: चुकीचा असून नागरिकांनी भारत निवडणूक आयोगातर्फे किंवा प्रशासनातर्फे यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा. नागरिकांनी असे संदेश अग्रेषित करू नये. चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मतदारांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली(Loksabha Election 2024) आहे.नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी अधिकृत सुविधांचा उपयोग करावा.

 

Maval Loksabha Election: मतदान यंत्रांची रँडमायझेशन; 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.