Maval Loksabha Election: मतदान यंत्रांची रँडमायझेशन; 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्यासह  उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात(Maval Loksabha Election) आली.

 

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी ईव्हीएम नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांच्यासह मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, सचिन मस्के, मावळ विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या समन्वय अधिकारी पूनम कदम, चिंचवड विधानसभा निवडणूक कार्यालयाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराम देशमुख, पनवेल विधानसभा निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी विनय पाटील तसेच कर्जत, उरण विभानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित(Maval Loksabha Election) होते.

 

 

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा  समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल  युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच, यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 544 मतदान केंद्रे असणार आहेत. त्याकरिता 1 हजार 958 बॅलेट युनिट, 750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये 339 मतदान केंद्रे असणार आहेत. त्याकरिता 1 हजार 220 बॅलेट युनिट,  467 कंट्रोल युनिट आणि 491 व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर उरण विधानसभा मतदारसंघामध्ये  344 मतदान केंद्रे असून त्याकरिता 1 हजार 238 बॅलेट युनिट,  474 कंट्रोल युनिट आणि 498 व्हीव्हीपॅट लागणार आहेत.

 

 

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये  390 मतदान केंद्रे आहेत. त्याकरिता 1 हजार 404 बॅलेट युनिट,  553 कंट्रोल युनिट आणि 592 व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये  549 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्याकरिता 1 हजार 976 बॅलेट युनिट,  779 कंट्रोल युनिट आणि 839 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये 400 मतदान केंद्रे असून त्याकरिता 1 हजार 440 बॅलेट युनिट, 568 कंट्रोल युनिट आणि 608 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राखीव यंत्रांसह आवश्यक असलेल्या मतदान यंत्रांची पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय द्वितीय स्तरावरील  सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया आज दि.(2 मे) रोजी पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.