My First Selfie Vote : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धा

एमपीसी न्यूज – जिल्ह्यात 7 व 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व विधानसभा मतदारसंघात नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी (तृतीयपंथीय) वंचित घटकातील अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता ‘माय फस्ट सेल्फी वोट’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीत अधिकाधिक नवयुवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे(My First Selfie Vote) यांनी केले आहे.

 

मतदानाच्या दिवशी (7 व 13 मे) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम मतदान करणाऱ्या 18 ते 19 वयोगटातील  नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदारांने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहीत 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. सदरचा सेल्फी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या 9270105593 या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावा. सेल्फी पाठवतांना मतदारांनी आपली माहिती व छायाचित्रे पाठवावे. माहितीमध्ये नाव, आडनाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक याचा समावेश करावा. युवा, महिला, दिव्यांग आणि पारलिंगीबाबत उल्लेख करावा.

 

प्रथम मतदान करणाऱ्या नवयुवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदाराला फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. याकरीता मतदाराने मतदान केल्याबाबतचा सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ‘स्वीप पुणे’ ला टॅग करून पोस्ट करावा.

 

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 याप्रमाणे एकूण 210 मतदारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये नवयुवा तरूण-तरुणीचे प्रमाण 50 टक्के असणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मतदाराला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले सहभागी झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या मतदारांची ‘नवमतदारांना’ विधानसभा-2024 साठी पुणे जिल्ह्याचे ‘नवयुवा मतदारदूत’ म्हणून  नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या 210 मतदारांपैकी निवडक एकूण 10 युवा मतदारांना त्यांच्या महाविद्यालयात किंवा भागात स्टॅंडीज उभारुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना ‘स्वीप’च्या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार(My First Selfie Vote) आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात या नवयुवादुतांमार्फत अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी  करण्यासाठी प्रयत्न करावे. या स्पर्धेविषयी मतदान केंद्र जनजागृती गट, चुनाव पाठशाला, मतदार जनजागृती मंच आदीमार्फत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.