Pimpri : मंगलाष्टकांऐवजी सर्वांना दिलेली मतदान करण्याची शपथ

एमपीसी न्यूज –  विवाह सोहळ्यात भटजींनी मंगलाष्टकांऐवजी सर्वांना दिलेली मतदान करण्याची शपथ…वधू-वरांनी लग्नाचे फेरे घेण्यापूर्वी हातात धरलेला मतदान जनजागृतीचा संदेश आणि अक्षदा टाकण्यापूर्वी उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी घेतलेली मतदान करण्याची शपथ… बुधवारी दि.(1 मे) रोजी काळेवाडी येथील थोपटे  लॉन्स  मंगल कार्यालयात शुभम गोरे आणि प्रणिता सोनके यांच्या विवाह सोहळ्यात असे आगळेवेगळे दृष्य पहावयास  मिळाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात उपस्थित वऱ्हाडी मंडळीने मतदान करण्याचा निर्धार(Pimpri) व्यक्त केला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली  पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन(Pimpri) करण्यात आले.

या लग्नसोहळ्यात विवाहविधी सुरू होण्यापूर्वी  मतदान शपथेचे वाचन करण्यात आले. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,जात, वंश,समाज किंवा भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची  शपथ घेतली. 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार  यावेळी करण्यात आला आणि नंतर विवाहसोहळ्यास सुरूवात झाली.

LokSabha Elections : पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

यावेळी  पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, नोडल पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे  आदी उपस्थित होते. नवविवाहित वधूवरांनी देखील भेटीस आलेल्या सर्व नातेवाईक,पाहुणे आणि उपस्थितांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.