Pune : व्हिडीओ लाईक, शेअर केल्यास पैसे मिळतील असे सांगत तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास प्रत्येक व्हिडीओसाठी 50 रुपये मिळतील, असे सांगत तरुणाची तीन लाख 53 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाईन माध्यमातून लोणीकंद येथे घडली.

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाने लोणीकंद(Pune) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने तरुणाची लाखोंची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादीस संपर्क करून त्यांना व्हिडीओ पाठवू असे सांगितले.आरोपींनी पाठवलेल्या व्हिडीओला लाईक आणि शेअर केल्यास प्रत्येक व्हिडीओचे 50 रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर तरुणाकडून बँकेचे तपशील घेत बँक खात्यातून तीन लाख 53 हजार 105 रुपये कपात करून घेत फसवणूक केली. लोणीकंद(Pune) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.