Pune : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने तरुणाची लाखोंची फसवणूक

एमपीसी न्यूज – पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने एका तरुणाची चार लाख 85 हजार 900 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाईन माध्यमातून(Pune) घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : रिक्षा प्रवासात तरुणाचा मोबाईल पळवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी तरुणाशी फोनवरून संपर्क केला. तरुणाला पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्याला वेगवेगळे टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यास मोठी रक्कम मिळेल असे सांगून तरुणाकडून चार लाख 85 हजार 900 रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला कोणतीही रक्कम न देता त्याची फसवणूक केली. मुंढवा(Pune) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.