Pune : बसमध्ये चढताना प्रवासी महिलेचे मंगळसूत्र चोरीला

एमपीसी न्यूज – बसमध्ये चढताना प्रवासी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री साडे नऊ वाजता हडपसर गाडीतळ(Pune) येथे घडली.

याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : रिक्षा प्रवासात तरुणाचा मोबाईल पळवला

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हडपसर गाडीतळ येथून सासवड येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे(Pune) सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.