Pune : पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची जोरात बँटीग, शहरात 15 झाडपडीच्या घटना

एमपीसी न्यूज – हवामान खात्याने पुणे व आसपासच्या परिसरात आज व पुढील चार दिवस पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आज (शुक्रवारी) दुपारी दोनपासूनच पावसाला जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहर परिसरात विविध ठिकाणी दुपारी साडे तीन ते साडे चार या कालावधीत दहा झाड पडीच्या घटना झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.हडपसर भागात झाडावर वीज पडून झाड जळाले(Pune) आहे.

 

अग्निशमन दलाने पावसाचा जोर ओसरताच रस्त्यावर पडलेली झाडे हटवली आहेत. पाऊस थांबला असला तरी हवेतील गारवा व दाटून आलेले ढग मात्र कायम आहेत.

 

       

या पावसात एकूण 15 झाडे तुटली आहेत त्यातील दुपारी साडेतीन ते साडेचार या कालावधीत दहा मोठी झाडे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कोसळली आहेत.

1) दुपारी 3.30  – कोंढवा खुर्द, शितल पेट्रोल पंपाजवळ

2)दुपारी 3.35  – धायरी रस्ता, ज्योती बेकरी जवळ

3) दुपारी3.40 – भवानी पेठ, मक्का मस्जिद जवळ

4)दुपारी 3.56 – एरंडवणा अग्निशमन केंद्राच्या बाजूला

5)दुपारी 4.03 – कोंढवा बुद्रुक

6) दुपारी 4.05 – येरवडा, सादल बाबा चौक

7) दुपारी 4.20 –  लोहिया नगर

8) दुपारी 4.22 – कोथरुड, गिरीजा शंकर सोसायटी

9)दुपारी 4.30 – स्वारगेट, वेगा सेंटर

10) दुपारी 4.30 – स्वारगेट पोलिस लाईन जवळ

पुढे वेळ 4.30 ते 5.30 वाजता

11)दुपारी 4.40 – बिबवेवाडी रस्ता, कोठारी ब्लॉक

12)दुपारी 4.45- महर्षीनगर, वैष्णवी डेअरी समोर

13)दुपारी 4.48 – सहकार नगर

14) संध्याकाळी 5.10 – लोहगाव, साई शांती पार्क

15) संध्याकाळी 5.14 – येरवडा, आंबेडकर नगर

तर हडपसर, शंकर महाराज मठाजवळ वीज पडून झाड पेटल्याची घटना घडली आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र योग्य ती काळजी घेवून घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.