Hinjawadi : तडीपार गुंडाकडून हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या 28 हजारांच्या बनावट चलनी नोटा, दहा दुचाकी, दोन रिक्षा

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या तडीपार गुंडाकडून पोलिसांनी कोयता जप्त केला. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करत पोलिसांनी 28 हजारांच्या बनावट चलनी नोटा, 10 दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त(Hinjawadi) केल्या. अक्षय उर्फ सोन्या काळूराम हुलावळे (वय 29, रा. हुलावळे वस्ती, साखरे वस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

 

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हिंजवडी पोलीस ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये पोलिसांना अक्षय हुलावळे हा आढळून आला. त्याच्याकडे कोयता हे शस्त्र मिळाले. अक्षय हुलावळे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 20 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

 

दरम्यान, अक्षय हुलावळे हा नकली नोटा तयार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचे साथीदार अटक असून तो फरार होता. त्यामुळे हिंजवडी पोलिसांनी अक्षय हुलावळे याला त्या गुन्ह्यात अटक केली. हुलावळे याने त्याच्या चार साथीदारांसोबत मिळून सातारा जिल्ह्यातील वाई येथे नकली नोटा तयार केल्या होत्या. हुलावळे याच्या कडून 28 हजार रुपये किमतीच्या 500 रुपये दराच्या 56 बनावट चलनी नोटा(Hinjawadi) जप्त केल्या.

तसेच अक्षय हुलावळे हा वाहन चोरीच्या गुन्ह्यातील देखील आरोपी असल्याने त्याच्याकडे त्याबाबत चौकशी करत चोरीच्या दहा दुचाकी आणि दोन तीनचाकी रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या. अक्षय हुलावळे याच्या विरोधात हिंजवडी, वाकड, चिंचवड, सांगवी, पिंपरी, दिघी, सिंहगड रोड पोलीस ठाण्यांमध्ये 19 गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.