Maharashtra : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – आज राज्यासह देशात पुढील 48 तास मुसळधार ( Maharashtra) पाऊस पडण्याची शक्यता  हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नव्याने सक्रीय होणाऱ्या वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे हवामानावर  परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पर्वतीय भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बर्फवृष्टी  होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Pune : शरद मोहोळ खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ

वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज मैदानी भागात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तर ईशान्य भारतात पुढील 48 तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात  मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल रात्री उशिरा पुणे शहरासह अनेक ठिकाणी  पावसानं हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात काही काळासाठी थोडासा गारवा निर्माण  होऊन नागरिकांची उकाड्यापासून थोड्या वेळासाठी सुटका ( Maharashtra) झाली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.