Shirur LokSabha Election : शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी 32 उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या  निवडणूक कार्यक्रमानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 35 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी 32  उमेदवार निवडणूक रिंगणात  आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे(Shirur LokSabha Election) यांच्या हस्ते निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे आदी उपस्थित होते. चिन्ह वाटपानंतर श्री. मोरे यांनी उमेदवारांना निवडणूक नियमांची माहिती दिली.  निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांना 95 लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. उमेदवारांकडून खर्च मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये.  नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून  खर्च गणना केली जाईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

 

प्रचार कालावधीमध्ये केवळ रुपये 10 हजारापर्यंतचा खर्च रोखीने करता येईल, 10 हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करता येईल,  निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके, स्थिर सर्वक्षण पथके तसेच  व्हिडीओ नियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 509 मतदान केंद्र आहेत. उमेदवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करावेत, अशा सूचना मोरे यांनी केल्या.

उमेदवारांसाठी निवडणूक प्रचाराची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतची असेल. दोन धर्मात समाजात तेढ निर्माण होईल असा प्रचार करू नका किंवा देव-देवतांचा, धार्मिक चिन्हाचा प्रचारात अजिबात वापर करू नये. मतदानापूर्वी 48 तास प्रचार थांबविण्यात यावा. आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास  निवडणूक कार्यालयाकडे तक्रार करावी. मतदानाच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आवशक आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता मॉक पोल घेतले जाईल.

 

Maval LokSabha Election : मावळमध्ये 33 उमेदवार, 2 जणांची माघार; ‘हे’ आहेत उमेदवार

 

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरावर उमेदवारांनी त्यांचा बूथ लावणे आवश्यक आहे. बूथ लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेकडून उमेदवारांनी परवानगी घ्यावी अशा सूचना देवून  लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.