Theur : बकोरी ते थेऊर अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू ; एकाची प्रकृती गंभीर

एमपीसी न्यूज :  अष्टविनायक महामार्गावर (बकोरी ते थेऊर) जोगेश्वरी मंदिरासमोर कंटेनर व कारचा दि.(28) रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या चार प्रवाशांपैकी तीन जणांचा रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चौथ्या प्रवाशाची(Theur) प्रकृती गंभीर आहे.

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, शिक्रापूरमध्ये राहणाऱ्या तरुणाने नवी कार घेतली होती. ही कार घेऊन शिक्रापूरचे सात तरुण थेऊर येथे गणपती दर्शनासाठी गेले होते. या सातपैकी तीन तरुण नवीन कारमध्ये होते तर चारजण दुसऱ्या कारमध्ये होते. यातील दुसऱ्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने  खूप जोरात धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा जागीच चक्काचूर झाला.

 

Hinjawadi : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

 

अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, वैद्यनाथ केदार, प्रदीप भुजबळ, विशाल गायकवाड या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. गणेश जाधव ( वय 32 ), विनोद भोजणे ( वय 36),  विठ्ठल जोगदंड (वय 36 ) या अशी मृतांची नावे असून ते शिक्रापूरचे रहिवासी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.