Shikrapur : वृद्ध महिलेचा खून करून घरात चोरी

एमपीसी न्यूज – घरात जबरदस्तीने घुसलेल्या चोरट्यांनी 76 वर्षीय महिलेचा खून केला. त्यानंतर घरातून एक लाख 23 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी सहा वाजता शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक(Shikrapur) येथे उघडकीस आली.

कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय 76, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णाबाई यांच्या 36 वर्षीय सुनेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल (Shikrapur) करण्यात आला आहे.

Talwade: शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाबाई यांची सून फिर्यादी सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घराच्या सेफ्टी दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी कृष्णाबाई घरी एकट्याच होत्या. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कृष्णाबाई यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला व त्यानंतर घरातून एक लाख 23 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.