Nigdi : ‘मॉर्निंग वॉक’ करत खासदार बारणे यांनी साधला मतदारांशी संपर्क

एमपीसी न्यूज  – “निगडीची निसर्गरम्य दुर्गादेवी टेकडी ही मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी पिंपरी-चिंचवडकरांची पहिली पसंती आहे. दररोज सकाळी हजारो नागरिक या ठिकाणी येतात. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दि. (6 मे) रोजी सकाळी दुर्गादेवी टेकडीवर जात ‘मॉर्निंग वॉक’ करण्याबरोबरच(Nigdi) मतदारांशी संपर्क साधला”. त्यावेळी जय श्रीराम च्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला.

 

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रचाराच्या धामधुमीत वेळ काढून मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधण्याची संधी घेतली.

 

त्यावेळी भाजपचे नेते राजू दुर्गे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला पाचपुते, शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक चेतन भुजबळ तसेच मयूर बारणे, दीपक गुजर, रवींद्र नामदे, शिवाजी शेडगे,आप्पा डेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते(Nigdi) उपस्थित होते.

सकाळी साडेसहा वाजता खासदार बारणे दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले. सहकाऱ्यांबरोबर टेकडी चढून जात असताना त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. खासदार बारणे यांना टेकडीवर पाहून अनेकांना सुखद धक्का बसल्याचे दिसून येत होते. खासदार बारणे यांनी नागरिकांना अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन केले.

खासदार बारणे यांच्या समवेत फोटो व सेल्फी घेण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत होते. त्या सर्वांशी हस्तांदोलन करीत बारणे हसतमुखाने सर्वांना फोटो आणि सेल्फी देत होते. शहरातील अनेक व्यापारी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, प्रतिथयश व्यावसायिक, खेळाडू यांची या ठिकाणी भेट झाली. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणाही लोकांनी यावेळी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.