Loksabha Election :  लोकसभा निवडणूक मतदाना दिवशीचे आठवडे बाजार बंद

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया (Loksabha Election )शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या 7 मे रोजी बारामती व 13 मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

 

मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये हे आदेश जारी(Loksabha Election )करण्यात आले असून त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मुळशी तालुक्यातील पौड, बावधव खुर्द, पुरंदर तालुक्यातील वाल्हा, दौंड तालुक्यातील केडगांव, मलठण, रावणगाव व बोरीपार्धी, बारामती तालुक्यातील पणदरे, मुर्टी, करंजेपुल, निरावागज, उंडवडी सुपे व सोनगाव, इंदापूर तालुक्यातील लाकडी, कळस, काटी, टणू, निरवांगी व खोरोची व भोर तालुक्यातील भोर या ठिकाणचे आठवडे बाजार 7 मे रोजी बंद राहतील.

 

Google Doodle: भारताची पहिली व्यावसायिक कुस्तीपटू हमीदा बानो यांना गुगल डूडलकडून मानवंदना

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार 13 मे  रोजी बंद राहतील. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.