Pimpri : राडारोडा टाकणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई ;सव्वा लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – रावेत आणि निगडी परिसरात पवना नदीकडेला बांधकाम राडारोडा (Pimpri )टाकणाऱ्या दोन वाहनांवर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या पथकाने  कारवाई केली आहे. त्या वाहनांच्या मालकांना एकूण 1 लाख 36 हजार 760 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पुन्हा ही वाहने राडारोडा टाकताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली (Pimpri )कनिष्ठ अभियंता स्वप्निल पाटील, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे यांच्या पथकाने एमएसएफ व मेस्को जवानांच्या मदतीने ही कारवाई केली.

 

नदीकाठी व उघड्यावर बांधकाम राडारोडा टाकण्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.

 

Pimpri : मतदान जनजागृतीसाठीच्या दुचाकी फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद

नदीकडेला राडारोडा टाकला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाली होती. त्यानुसार, अभियांत्रिकी विभागाच्या पथकाने त्या भागात जाऊन पाहणी केली. त्यात दोन वाहने राडारोडा टाकत असल्याचे आढळून आले. रफिक सोफीलाल शेख यांचा टेम्पो (एमएच 04 सीजी 3501) आणि अमित साखरे यांचा हायवा (एमएच 14 एचयु 7047) अशी वाहने पकडण्यात आली. त्यांना अनुक्रमे 10 हजार आणि 1 लाख 26 हजार 760 रुपये असे एकूण 1 लाख 36 हजार 760 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.