Google Doodle: भारताची पहिली व्यावसायिक कुस्तीपटू हमीदा बानो यांना गुगल डूडलकडून मानवंदना

एमपीसी न्यूज – गुगल डूडलकडून भारताची पहिली व्यावसायिक कुस्तीपटू (Google Doodle)हमीदा बानो यांना मान वंदना मिळाली आहे. 1940 आणि 50 च्या दशकात कुस्तीच्या पुरुष – प्रधान जगात प्रवेश करण्याच्या शक्यतांना झुगारून देणारी एक अग्रणी भारतीय महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांचे स्मरण करते. भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू म्हणून जगप्रसिध्द ओळख मिळाली. बानूने प्रचंड नाव कमावले. धाडसी वृत्तीमुळे त्यांना वृत्तपत्रकांनी अलिगड चा अॅमेझोन असं नाव दिलं.

बीबीसीच्या अहवालानुसार, फेब्रुवारी 1954 मध्ये, हमीदा बानू जेव्हा(Google Doodle) वयाच्या  30 वर्षाची झाली होती, त्यावेळीस तीनं जाहीर केलं की, जो कोणीही तिला कुस्तीच्या सामन्यात हरवू शकतो तो तिच्याशी विवाह बंधनात अडकणार. त्यानंतर तिने पटियाला आणि कोलकत्ता येथील दोन पुरुष चॅम्पियन्स चा पराभव केला.

Karjat : स्वतः गद्दारी करणाऱ्यांनी निष्ठेची भाषा बोलू नये – प्रशांत ठाकूर

 

त्याच वर्षी तिसऱ्या सामन्यासाठी ती वडोदरा येथे गेली, तिथे तिने बाबा पहेलवानशी लढा दिला. तेथे दुसऱ्या पुरुष कुस्तीपटूंने एका महिलेला सामोरे जाण्यास नकार दिल्याने माघार घेतली. बानूने अवघ्या 1 मिनिट 34 सेकंदात ही लढत जिंकली.

या काळात एका महिलेने कुस्ती खेळणं हे वादग्रस्त होते. अनेकांनी तीच्यावर टीका केली. काहींनी दावा केला की,  तीचं कुस्ती  खेळणं हे पूर्व नियोजन करून असे. त्यांच्यावर काही पुरुष गटांनी दगडफेक आणि मारहाण केलं, त्यांना अनेक अडचणींना सामाना करावा लागला .

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.