Google doodle : विश्वचषक क्रिकेट सामन्यानिमित्त गुगलचे विशेष डूडल

एमपीसी न्यूज – आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक (ICC Mens Cricket World Cup 2023) सामना (Google doodle) आज (रविवारी, दि. 19) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात हा सामना खेळला जात आहे. संपूर्ण देशभर क्रिकेट फिवर असतानाच गुगलकडून देखील विशेष डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

google शब्दात दुसऱ्या ‘O’ मध्ये विश्वचषक आणि ‘L’ या शब्दात बॅटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच क्रिकेटचे पीच आणि प्रेक्षक देखील दाखवण्यात आले आहेत.

Pune : भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील गुडलक चौकात काढण्यात आली भव्य रांगोळी

यावर्षीचे क्रिकेट विश्वचषक सामने 5 ऑक्टोबर पासून सुरु झाले. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, नेदरलॅंड या संघांचा यावर्षीच्या विश्वचषक सामन्यात सहभाग होता. भारताने नऊ पैकी नऊ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने नऊ पैकी सात सामने जिंकले.

भारत यावर्षीच्या गुणतालिकेत 18 गुण घेत सर्वात आघाडीवर आहे. तर ऑस्ट्रेलिया 14 गुण घेऊन तिस-या स्थानावर. भारताने अंतिम सामना जिंकावा यासाठी अवघ्या देशभरातून टीमला शुभेच्छा दिल्या जात (Google doodle) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87f4fc478ae31132',t:'MTcxNDk1NjcyNi4yNTcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();