Pune : भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील गुडलक चौकात काढण्यात आली भव्य रांगोळी

एमपीसी न्यूज- आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना ( Pune ) आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडतोय. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करण्यास सज्ज झाला आहे.पुण्यातील क्रिकेट प्रेमींनी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी  गुडलक चौकात भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.

Pune : होर्डिंगच्या परवान्यांची मुदत संपूनही नूतनीकरण नाही; पुणे महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान

या रांगोळीवर तिरंगा काढला असून मध्यभागी क्रिकेट वर्ल्ड कपची ट्रॉफी देखील साकारण्यात आली ( Pune ) आहे. तर काही क्रिकेट प्रेमींनी भारत विश्वविजेता बनावा म्हणून सारसबाग येतील गणपतीची महाआरती करून गणरायाला साकडे घातले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.