Vadgaon : पाहिल्याच्या रागातून एकावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज – केवळ पाहिल्याच्या रागातून तिघांनी एकावर तलवारीने वार केले. ही घटना वडगाव-तळेगाव फाटा, वडगाव येथे सोमवारी (दि. 29) सायंकाळी(Vadgaon) घडली.

 

नितीन भाऊ शेलार (वय 36, रा. नानोली तर्फे चाकण, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन शेलार हे वडगाव येथून वडगाव-तळेगाव फाटा येथे जात होते. फाट्याजवळ आल्यानंतर एका दुचाकीवरून तिघेजण आले. ते हातात तलवार फिरवत जात(Vadgaon) होते. नितीन शेलार यांनी आरोपींकडे पाहिले.

 

पाहिल्याच्या कारणावरून नितीन यांच्याजवळ आरोपी आले. त्यांनी नितीन यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. नितीन हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर आरोपी पळून गेले. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.