Vadgaon Maval : राष्ट्रवादी शरद पवार गट ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अतुल राऊत यांची निवड

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाच्या (Vadgaon Maval) ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी दिले. राऊत हे विविध राजकीय,सामाजिक संस्था, कला,सांस्कृतिक,सहकार क्षेत्रातील संस्थांवर काम करीत आहेत.

मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे शुभहस्ते गोविंदबाग बारामती येथे नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर व पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने पुन्हा जिल्ह्यावर काम करण्याची संधी मिळाली.

यावेळी सोबत जिल्ह्याचे मुख्य संघटक संजय जकाते, महिला उपाध्यक्षा स्वप्नाताई लोणकर, मुळशी तालुका अध्यक्ष बाळासाहेब झोरे, मावळ तालुका अध्यक्ष मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, बाळासाहेब खंडागळे,वडगाव शहराध्यक्ष मयूर गुरव, बारामती तालुका उपाध्यक्ष प्रमोद बोराटे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष आफताब सय्यद, मावळ तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ शिंदे, मा. उपसरपंच विशाल वहिले, ज्येष्ठ नेते नितीनजी भांबळ, मा. ग्रा.पं.सदस्य बारकु नाना ढोरे, अरुण वाघमारे, प्रथमेश घाग, विराज राऊत उपस्थित होते.

तळागाळातील सर्व सामान्यांचे प्रश्न अडचणी सोडवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार निवडीनंतर राऊत यांनी (Vadgaon Maval) व्यक्त केला.

Pune : 20 लाखाचे पाच कोटी देण्याच्या आमिषाने भोंदूने केली व्यावसायिकाची फसवणूक

अतुल राऊत हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया ओबीसी सेलचे प्रभारी असून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव दाभाडेचे सचिव, सदस्य, वडगाव नगरपंचायत दक्षता समिती, प्रकल्पप्रमुख, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा, अध्यक्ष स्मित कला रंजन (डान्स मावळ डान्स), अध्यक्ष, मावळ विचार मंच, उपाध्यक्ष, मावळ सोशल फाउंडेशन आदी संस्थावर कार्यरत आहेत.

राऊत यांच्या निवडीने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.